
सध्या टाटा या वाहनिर्मिती करणाऱ्या टाटा पंच या कारची देशभरात चर्चा सुरू आहे. या कारची किंमत आणि कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे या कारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

टाटा या कंपनीने आपल्या 'टाटा पंच' या कारचे नव्हे व्हर्ज लॉन्च केले आहे. टाटाने आणलेल्या या टाटा पंचची सुरुवातीचा किंमत फक्त 5.60 लाख रुपये आहे. या कराची ऑनरोड प्राईज 6.62 लाख रुपये आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीलाही ही कार खरेदी करताय येऊ शकते.

ज्या व्यक्तीचा मासिक पगार 40 हजार रुपये आहे, ती व्यक्ती टाटा पंच या कारच्या बेस मॉडेलची खरेदी करू शकते. विशेष म्हणजे त्यासाठी संबंधित व्यक्तीला फक्त 32 हजार रुपये डाऊन पेमेंट म्हणून द्यावे लागतील. म्हणूनच ही कार फार चर्चेत आहे.

तुमच्या बँक खात्यात 40 हजारांपेक्षा जास्त पगार येत असेल आणि तुमचा सिबिल 750 च्या पुढे असेल तर तुम्हाला टाटा पंच खरेदी करण्यासाठी 95 टक्क्यांपर्यंत वाहन कर्ज मंजूर होऊ शकते.

या सर्व बाबी जुळून आल्या तर तुम्हाला फक्त 32 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. यासाठी तुम्हाला 9200 रुपयांचा ईएमआय येईल. पुढच्या 7 वर्षांसाठी तुम्हाला हा ईएमआय भरावा लागेल.