
बीएमडब्ल्यू कंपनीने एक्स 3 एसयुव्हीचे दोन डिझेल व्हेरियंट ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. या व्हेरियंटची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या. (Photo- BMW)

नव्या व्हेरियंटच्या डॅशबोर्ड लेआऊटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. एसयुव्हीमध्ये जेस्चर कंट्रोलसह नवं इंफोटेनमेंट सिस्टम आहे. हे वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. थ्री डी नेव्हिगेशनसह 12.3 इंचाचा फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर या गाडीत आहे. (Photo- BMW)

सुरक्षेसाठी स्टॅबिलिटी कंट्रोल, एबीएससह ब्रेक असिस्ट, कॉर्निरिंग ब्रेक कंट्रोल, ISOFIX चाइल्ड माउंट्स, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि 6 एअरबॅग्स असे फीचर्स असणार आहेत. कारमध्ये मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील, हारमन कार्डोन साउंड सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, अँबियंट लाइटिग, पॅनोरमिक सनरूफ आणि 3 झोन क्लायमेट कंट्रोल फीचर्स आहेत. (Photo- BMW)

कारमध्ये 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 190 बीएचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. ही कार 7.9 सेकंदात 0 ते 100 किमी वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे. (Photo- BMW)

BMW X3 xDrive20d xLine या व्हेरियंटची किंमत 67 लाख 50 हजार (एक्स-शोरुम) इतकी आहे. तर BMW X3 xDrive20d M Sport या व्हेरियंटची किंमत 69 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. दोन्ही व्हेरियंट आजपासून डीलर्सकडे उपलब्ध आहेत. (Photo- BMW)