नागाचं नुकतंच जन्मलेलं पिल्लूही तेवढंच विषारी असतं का? जेवढा पूर्ण वाढ झालेला साप

तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडलाच असेल की, सापाचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू हे पूर्ण वाढ झालेल्या सापाइतकंच विषारी असतं का? चला तर जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर

| Updated on: Feb 16, 2025 | 7:37 PM
1 / 7
भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. त्यातील काही मोजक्याच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच विषारी असतात. बाकी सर्व साप हे बिनविषारी आहेत.

2 / 7
भारतामध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो या चार प्रमुख विषारी जाती आहेत, हे साप त्यांचा रंग, आकार आणि इतर गोष्टींवरून तुम्ही ओळखू शकता.

3 / 7
मात्र तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये जर साप आढळला तर त्याला चुकूनही पकडण्याचा प्रयत्न करू नका, ते तुमच्या  जीवावर बेतू शकतं. त्याला मारू देखील नका. त्याची माहिती तुमच्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांना द्या.

4 / 7
भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत. या प्रजातींपैकी काही प्रजातीचे साप हे थेट पिल्लांना जन्म देतात, तर काही साप हे मात्र पिल्लांना थेट जन्म न देता आंडे घालतात.

5 / 7
एक साप हा एकाच वेळी अनेक पिल्लांना जन्म देतो, तो किती पिल्लांना जन्म देतो, ते तो कोणत्या प्रजातीचा साप आहे? यावर अवलंबून असतं. आता जाणून घेऊयात की सापाचं नुकतचं जन्मलेलं पिल्लूही सापाइतकंच विषारी असतं का?

6 / 7
तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडलाच असेल की, सापाचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू हे पूर्ण वाढ झालेल्या सापाइतकंच विषारी असतं का? तर याचं उत्तर होय असं आहे. नागाचं पिल्लू हे तेवढंच विषारी असतं जेवढा नाग विषारी असतो. त्यामुळे त्याला चुकूनही पकडण्याचा प्रयत्न करू नये.

7 / 7
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या पिल्लाच्या विषग्रंथीमध्ये देखील तेवढंच विष असतं, आणि ते नुकतंच जन्मल्यामुळे त्याचे दात देखील अणकुचीदार असतात. त्यामुळे मोठा साप जेवढं विष तुमच्या शरीरामध्ये इंजेक्ट करू शकतो, तेवढंच किंवा त्यापेक्षाही जास्त सापाचं पिल्लू करू शकतं.