हे गाणं गाण्यासाठी पाकिस्तानी गायिकेने धरलेला प्रचंड हट्ट, आशा भोसलेंचा पत्ता झालेला कट

44 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे ऐकताच प्रत्येकजण गुणगुणतो. ज्याला गाण्यासाठी पाकिस्तानी गायिकेने धरला होता प्रचंड हट्ट. आशा भोसले यांना काढून गायिकेने गायलं होतं गाणं.

| Updated on: Aug 11, 2026 | 2:52 PM
1 / 5
हिंदी सिनेमातील काही गाणी काळाच्या ओघातही आपली लोकप्रियता टिकवून ठेवतात. प्रेम, विरह आणि मनातील वेदना व्यक्त करणाऱ्या अशाच सदाबहार गाण्यांमध्ये 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निकाह' चित्रपटातील ‘दिल के अरमां आंसुओं में बह गए’ या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.

2 / 5
आजही हे गाणं ऐकताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. या लोकप्रिय गाण्याचे बोल हसन कमाल यांनी लिहिले होते तर संगीतकार रवी यांनी त्याला संगीत दिले. विशेष म्हणजे, हे गाणं सुरुवातीला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा संगीतकारांचा मानस होता.

3 / 5
आशा भोसले यांच्या आवाजाचा पोत लक्षात घेऊन गाण्याची चालही त्यानुसार तयार करण्यात आली होती. मात्र, या गाण्याच्या प्रवासात सलमा आगा यांची भूमिका निर्णायक ठरली. पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सलमा आगा यांनी निकाह चित्रपटातील गाणी आपणच गाणार असल्याचा आग्रह निर्माते-दिग्दर्शकांकडे धरला.

4 / 5
अखेर त्यांच्या आग्रहाला मान देण्यात आला आणि गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा निर्णय झाला. मात्र, रवी यांनी आशा भोसले यांच्यासाठी तयार केलेल्या मूळ पट्टीत सलमा आगा यांना गाणं काहीसे अवघड जात होते. त्यामुळे गाण्याच्या सुरांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले.

5 / 5
त्यानंतर सलमा आगा यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेले ‘दिल के अरमां आंसुओं में बह गए’ प्रचंड लोकप्रिय झाले आणि पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक गाण्यांपैकी एक बनले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us