
'बिग बॉस मराठी' फेम निक्की तांबोळी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. निक्की सध्या अरबाज पटेलला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलंय.

निक्की म्हणाली, "मी माझ्या भविष्याकडे खूप वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. मला मोठं कुटुंब आवडतं. मला एकत्र कुटुंबपद्धतीत राहायला आवडतं. मला लग्नही करायचंय आणि चार मुलांना जन्मही द्यायचा आहे. लोकांनी भरलेल्या कुटुंबात मला लग्न करायचं आहे."

"त्या कुटुंबात माझे आई-वडील, मुलाचे आई-वडीलसुद्धा असावेत. मला असं कुटुंब आवडतं. मला स्वयंपाकाचीही खूप आवड आहे. तसंच मला बाहेर काम करायलाही आवडतं", असं ती पुढे म्हणाली.

याविषयी अरबाजला कल्पना आहे का असं विचारल्यावर निक्कीने सांगितलं, "मी या विषयावर त्याच्याशी बोलत नाही. इतर अनेक विषय आहेत, ज्यावर आम्ही गप्पा मारतो, चर्चा करतो. कामाबद्दल बोलतो. शिवाय तो दुसऱ्या धर्माचा आहे."

"सध्या देशात हिंदू-मुस्लीमवरून किती वाद होत आहेत, काय-काय घडतंय. आम्ही फक्त एकमेकांना शांती देण्याचा प्रयत्न करतो. भविष्य, कुटुंब यांविषयी आम्ही एकमेकांशी बोलत नाही", असं तिने स्पष्ट केलं.