
नोरा फतेही हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. नुकताच नोरा फतेही हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोरा फतेही ही नव्या लूकमध्ये दिसत आहे.

नोरा फतेही हिचा यापूर्वी कधीच चाहत्यांनी अशाप्रकारचा लूक नक्कीच बघितला नसावा. नोरा फतेही हिने जे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये नोरा ही मल्टी रंगाच्या बॉल गाऊनमध्ये दिसत आहे.

या बॉल गाऊनमध्ये नोरा फतेही हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. एकीकडे नोरा फतेही हिच्या चाहत्यांना हा लूक आवडलाय तर दुसरीकडे मात्र, ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये.

एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, अगोदरच सुंदर असलेली नोरा आता तर फारच जास्त सुंदर दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, हे कलाकार काय घालतील याचा अजिबात नेम नाही.

अजून एकाने नोरा हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, हिने हे नेमके काय घातले आहे, हिला अशा कपड्यांमध्ये चालता नेमके कसे येत आहे, हेच मला मुळात कळत नाहीये.