
जर तुम्हाला वाटत असेल की व्हिस्की आणि टकीला हेच सर्वात स्ट्रॉन्ग ड्रिंक्स आहेत, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. भारताची प्रसिद्ध वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड यांनी सांगितले की, या दोघांपेक्षा कितीतरी पटीने स्ट्रॉंग अशी आणखी एक ड्रिंक आहे. या ड्रिंकमध्ये 60 ते 75 टक्के अल्कोहोलची मात्रा असते. आता हा दारु कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया या ड्रींक विषयी...

आम्ही ज्या ड्रिंकविषयी बोलत आहोत तिचे नाव ॲब्सिन्थ आहे. ही खास हिरव्या रंगाची ड्रिंक असते. ती सॉंफ, नागदॉना (वर्मवूड) आणि इतर काही हर्ब्सपासून बनवली जाते. म्हणून ड्रिंकची चव हर्बल आणि मसालेदार असते. बाकी ड्रिंक्स ब्राउन किंवा पारदर्शक असतात, पण ॲब्सिन्थचा रंग चमकदार हिरवा असतो. म्हणून तिला “ला फी व्हर्ट” (The Green Fairy) असंही म्हणतात. पाणी आणि साखर मिसळूनच प्यावी लागते

वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड सांगतात, ही ड्रिंक इतकी स्ट्रॉन्ग असते की थेट पिणं शक्यच नाही. त्यामुळे ग्लासामध्ये एक खास चमच्यावर साखरेचा तुकडा ठेवला जातो, त्यावर थंड पाणी हळूहळू ओतलं जातं. पाणी मिसळल्यावर ड्रिंकचा रंग दूधासारखा पांढरा होतो. या संपूर्ण प्रक्रियेला “लाऊझिंग” (Louching) म्हणतात. याच्याशिवाय हे ड्रिंग पिणे शक्यच नाही. त्यामध्ये अल्कोहॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याता पाणी आणि साखर घालणे गरजेचे असते.

“व्हिस्कीपेक्षा जास्त स्ट्रॉन्ग ड्रिंक कोणतीच नाही असं जर तुम्ही समजत असाल तर ही मोठी चूक आहे. ॲब्सिन्थ जर बिनधास्त प्याल, त्यामध्ये पाणी न टाकता तर खूप जास्त चढते आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी सावध राहा. त्यामध्ये पिण्यापूर्वी पाणी आणि सारख मिसळा” असा सल्ला वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड यांनी दिला आहे. ॲब्सिन्थ थेट प्यायल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो.

ॲब्सिन्थ ही ड्रिंक पिण्याआधी दोनदा विचार करा. या ड्रिंकमध्ये 75 टक्क्यापर्यंत अल्कोहॉल असल्यामुळे खूप कडवट लागते. तसेच ते प्यायल्यानंतर अक्षरशः घशामध्ये भाजल्यासारखे वाटते. त्यामुळे ॲब्सिन्थ पिण्यापूर्वी नक्की दोनदा विचार करा आणि नेहमी पाणी-साखरेसोबतच, कमी प्रमाणात घ्या. कधीकधी जास्तप्रमाणवर प्यायल्यामुळे प्रचंड त्रास होतो. त्यामुळ पिण्याआधीच विचार करा.