
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यावर आणि कुंटुबाची देखभाल करण्यावर लक्ष द्या. जवळच्या मित्रांना भेटा आणि रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी अडकलेली कामं पूर्ण करा. कामामुळे पूर्ण दिवस व्यस्त राहाल. तुम्हाल बढती मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

तुम्ही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. तसेच आसपास घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. पण प्रेमप्रकरणात तणावाची स्थिती राहील. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

आज मानसिक शांतता मिळेल. व्यावसायिक गुंतवणूक टाळा. सरकारी नोकरीत अधिकार्यांशी सभ्यतेनं वागा अन्यथा फटका बसू शकतो. कुटुंबात सुसंवाद राहील आणि विवाहित लोकांसाठी आनंददायी वातावरण राहील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. त्यामुळे तुम्हाला प्रगती नवे मार्ग खुले होतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करा. मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

तुमच्या कामाचं नियोजन करा. किचकट कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या अधिकाऱ्याची भेट लाभदायक ठरू शकते. प्रेम प्रकरणात फसवणूक किंवा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. कोणत्याही स्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

तुमच्या व्यक्तिमत्वाने इतरांवर चांगला प्रभाव पडेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवाल. व्यवसायात येणारे अडथळे हुशारीने सोडवा. घरात शांतता राहील, पण प्रेमप्रकरणात संयम ठेवा. नियमित योगा आणि व्यायाम करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

आज कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. काही अडचण असेल तर सोडवण्यासाठी भाग घ्या. व्यावसायिक स्पर्धेत कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. नोकरीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त रहाल. रखडलेल्या व्यावसायिक कामकाजाचे व्यवस्थापन करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

कामावर लक्ष केंद्रित कराल आणि भूतकाळातील चुका सुधारेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरीत बढती किंवा चांगल्या प्लेसमेंटच्या संधी मिळतील. ताण घेऊन काम केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)