
बाॅलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ड्रीम गर्लमध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत धमाकेदार अभिनय करताना नुसरत भरूचा ही दिसली होती.

काही दिवसांपूर्वीच ड्रीम गर्ल 2 ची घोषणा करण्यात आली. मात्र, निर्मात्यांनी सर्वांनाच धक्का देत या चित्रपटामध्ये नुसरत भरूचा ऐवजी थेट अनन्या पांडे हिला घेतले.

अनन्या पांडे हिला ड्रीम गर्ल 2 मध्ये घेतल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. नुकताच यावर नुसरत भरूचा हिने भाष्य केले आहे.

नुसरत भरूचा हिला विचारण्यात आले की, तुम्ही ड्रीम गर्ल 2 मध्ये का नाहीत? यावर नुसरत भरूचा म्हणाली की, तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा चित्रपट निर्मात्यांना विचारायला हवा.
