Shahid Kapoor : तो चित्रपट ज्यात शाहिद कपूरला हिरॉईनपेक्षा कमी पैसे मिळाले पण नवऱ्याला सुद्धा बायकोपेक्षा 3 कोटी कमी मिळाले
Shahid Kapoor : प्रत्येक चित्रपटात हिरोला हिरॉईनपेक्षा जास्त पैसा मिळतो. पण आठ वर्षांपूर्वी शाहिदने अशा चित्रपटात काम केलेलं जिथे त्याला हिरॉईनपेक्षा कमी पैसा मिळालेला.

Shahid Kapoor Fees : विशाल भारद्वाजच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'ओ रोमियो' चित्रपटासाठी शाहिद कपूरने भरपूर फी घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार त्याने 45 कोटी रुपये घेतले आहेत. या फिल्मची लीड एक्ट्रेस तृप्ति डिमरीला 6 कोटी रुपये मिळाले आहेत.

प्रत्येक चित्रपटात हिरोला हिरॉईनपेक्षा जास्त पैसा मिळतो. पण आठ वर्षांपूर्वी शाहिदने अशा चित्रपटात काम केलेलं जिथे त्याला हिरॉईनपेक्षा कमी पैसा मिळालेला. शाहिद कपूरसह रणवीर सिंह सुद्धा त्या चित्रपटात होता. संजय लीला भन्साळी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.

हा चित्रपट होता,'पद्मावत'. वर्ष 2018 साली हा चित्रपट रिलीज झालेला. शाहिदने या चित्रपटात मेवाडी राजपूत राजा महारावल रतन सिंहचा रोल साकारलेला. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहिदला 10 कोटी रुपये फी मिळाली होती.

दीपिकाने या फिल्ममध्ये रानी पद्मावतीचा रोल प्ले केलेला. या पिक्चरसाठी दीपिकाला 13 कोटी रुपये मिळालेले. ती या चित्रपटासाठी जास्त रक्कम चार्ज करणारी फि होती. रणवीर सिंहची फि त्यापेक्षा कमी होती.

रणवीर सिंहने 'पद्मावत' मध्ये अलाउद्दीन खिलजीचा रोल प्ले केलेला. रिपोर्ट्सनुसार रणवीरची फी शाहिद प्रमाणे 10 कोटी रुपये होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेला. या चित्रपटाने बजेटपेक्षा 2.7 पट जास्त कमाई केलेली.