
हिवाळ्यात मद्यप्राशन केले की शरीराला उबदार वाटते, असा दावा केला जातो. त्यामुळेच अनेकजण कडाक्याच्या थंडीत लोक रम हे मद्य आवर्जून पितात. परंतु या रममध्येही एक विशेष रम फारच लोकप्रिय आहे. हा ब्रँड 71 वर्षांपासून आजही तेवढाच चर्चेत आणि प्रसिद्ध आहे.

ओल्ड मंग असे या ब्रँडेड रमचे नाव आहे. भारताची ही एक फारच खास अशी डार्क रम मानली जाते. या रमची निर्मिती सर्वात अगोदर 1954 सालात मोहन मीकिन लिमिटेड या कंपनीने केली होती. तेव्हापासून ओल्ड मंक या रमचे मद्यबाजारात वेगळे स्थान आहे.

ओल्ट मंक ही रम तिच्या तयार करण्याची पद्धत आणि चवीमुळे ओळखली जाते. या रममध्ये व्हॅनिला, कॅरामल, डार्क चॉकलेट यांचा फ्लेवर असतो. त्यामुळेच लोकांना हा ब्रँड फार आवडतो. गेल्या कित्येक दशकांपासून ही रम लोकांना फार आवडतो.

ओल्ड मंक या रमची किंमतदेखील सामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळेच व्हॅल्यू फॉर मनी असल्यामुळे ही रम लोकांना फार आवडते. दिल्लीमध्ये 180 मिलीची ओल्ड मंक फक्त 355 रुपयांना मिळते. तर 750 रुपयांची बॉटल 1000 रुपयांना मिळते.

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्याप्राशन केल्याे यकृताशी संबंधित आजार होतात. मद्यप्राशनास प्रोत्साहन देण्याचा या स्टोरीचा उद्देश नाही.)