Maharashtra Exit Poll 2026 – एक्झिट पोलचे धक्कादायक अंदाज, कोणाच्या हाती किती महापालिका? सर्वात मोठा पक्ष कोणता?
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. काही ठिकाणी धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. जाणून घेऊयात.

गुरुवारी राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, महापालिकेचं मतदान होताच आता एक्झिट पोलचे अंदाज हाती येण्यास सुरुवात झाली आहे. विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची पिछेहाट होण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंगे गटाला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या युतीला 62 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
दरम्यान पुण्यामध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 6 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे, काँग्रेसला पुण्यात आठ जागा मिळण्याची शक्यता असून, मनसेचा एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Municipal Election 2026
Mumbai Election 2026 Exit Poll Results LIVE : एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत थेट धक्का...
PCMC Election Exit Poll 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा ठरतोय सर्वात मोठा पक्ष..
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपच बाजी मारण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 09, राष्ट्रवादीला 51, शरद पवार गटाला 2 आणि काँग्रेस व मनसेला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूरमध्ये देखील भाजपच आघाडीवर राहण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार कोल्हापूरमध्ये भाजपला 29 – ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेनेला 18 ते 21 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी अजित पवार गट 9 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0 ते 1 जागा मिळू शकते. मनसेला 1 जागा तर 2 ते 4 जागा या अपक्ष उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे.
