Children’s Day Gift Ideas: बालदिनानिमित्त ‘या’ गिफ्ट्ससह मुलांना द्या सरप्राईज!

| Updated on: Nov 02, 2022 | 2:23 PM
1 / 5
बालदिन जवळ आला आहे. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणजेच चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात येतो. मुलांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणण्यासाठी तुम्ही हा दिवस खास पद्धतीने साजरा करू शकता. त्यांना त्यांच्या आवडीनुसार गिफ्ट्स देऊ शकता किंवा एखादे सरप्राईज देऊन त्यांना खुश करू शकता.

2 / 5
पिकनिकला न्या - बालदिनाच्या निमित्ताने तुम्ही मुलांना पिकनिकला घेऊन जाऊ शकता. आजकाल धावपळीच्या जीवनात अनेकदा पालकांना मुलांना फारसा वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत पिकनिकच्या निमित्ताने तुम्ही मुलांसोबत थोडा क्वॉलिटी टाइम घालवू शकाल.

3 / 5
कॉस्च्युम पार्टी - बालदिनानिमित्त तुम्ही मुलांसाठी कॉस्च्युम पार्टीचे आयोजन करू शकता. या पार्टीत मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालून त्यांच्या मनानुसार तयारी करता येईल. बाहेर जायचे नसेल तर घरच्या घरीही तुम्ही या पार्टीची व्यवस्था करू शकता.

4 / 5
अनाथाश्रमात जाऊ शकता - बालदिनाच्या निमित्ताने मुलांना घेऊन वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमात जाता येऊ शकेल. हा दिवस त्या आश्रमात राहणाऱ्या लोकांसोबत साजरा करा. यामुळे तुम्हाला व त्यांनाही आनंद मिळेल

5 / 5
स्टेशनरी गिफ्ट करा - बालदिनानिमित्त तुम्ही मुलांना अभ्यासाशी संबंधित सामान भेट देऊ शकता. त्यामध्ये डेस्क लॅम्प, डायरी, पेपर कटर, टेबल लॅम्प्स, पेन्सिल पाउच किंवा बॅग्ज यांसारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.