रंगपंचमी निमित्त तुळजाभवानी आईचा गाभारा सजला, द्राक्षांची नयनरम्य आरास

| Updated on: Mar 22, 2022 | 11:10 AM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज रंगपंचमी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली. तुळजापूर येथील देवी भक्त संतोष बोबडे यांनी देवी चरणी ही द्राक्षांची आरास अर्पण केली होती.

1 / 6

2 / 6
देवीचरणी नवस पूर्ती म्हणून शेतातील पिक अर्पण करण्याची प्रथा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरु झाली असून त्याला भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संतोष बोबडे यांच्या शेतात पिकलेल्या द्राक्षांची भेट देवीला दिली आहे.

3 / 6
दरवेळी मोसंबी, द्राक्ष , आंबे, केळी यासह विविध फळे अर्पण केली जातात तर आकर्षक फुलांची सजावट केली जाते. या फळांमध्ये सजलेले देवीचे रुप खूप सुंदर वाटत होते.

4 / 6
द्राक्षाच्या आरासमुळे तुळजाभवानी देवीचा गाभरा आकर्षक दिसत होता. भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. आज देव होळी असल्याने होळीच्या पाचव्या दिवशी , चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो .

5 / 6
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला यावेळी तुळजाभवानी देवीला विविध रंग लावण्यात आले.

6 / 6
यावेळी मंदिर जनसंपर्क अधिकारी तथा धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यासह महंत वाकोजी बुवा, हमरोजी बुवा, पुजारी विशाल कदम, अविनाश गंगणे, विशाल रोचकरी, अभिजीत कुतवळ, मयूर कदम, गणेश क्षीरसागर, यांच्यासह पुजारी उपस्थित होते.