AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहाचा स्टॉल असतो मग मेडिकल शॉप का नसते ? रेल्वेने दिले हे कारण

रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थ आणि इतर गोष्टीचे स्टॉल असतात पण, औषधांची दुकाने नसतात...रेल्वेचा नियम काय ?

रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहाचा स्टॉल असतो मग मेडिकल शॉप का नसते ? रेल्वेने दिले हे कारण
tea stall
| Updated on: Jun 02, 2026 | 11:53 PM
Share

जेव्हा तुम्ही ट्रेनचा प्रवास करता तेव्हा तुम्ही पाहिले असेल की अनेक रेल्वे स्थानकातील फलाटांवर अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. फलाटांवर चहासह अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. पुस्तक आणि पेपर विक्रीचे स्टॉल असतात. परंतू औषधांच्या विक्रीची दुकाने मात्र सहसा आढळत नाहीत, एखादेच असे रेल्वे स्थानक असे जेथे मेडिकल स्टोअर्स पाहायला मिळत असेल. अखेर असे का होत असेल ? स्टेशनवर मेडिकल सारख्या सेवांची दुकाने का नाहीत ? तर पाहूयात या संदर्भात रेल्वेचे धोरण काय ?

मेडिकल शॉप्स संदर्भात नियम काय ?

रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर जर इतर दुकाने अलॉट केली जातात तसेच मेडिकल शॉप्स देखील अलॉट केले जात होते. मात्र, रेल्वेच्या अधिकृत दस्ताऐवजांनुसार साल २००१ मध्ये रेल्वे बोर्डाने हे स्पष्ट केले की डॉक्टरची सुविधा असलेल्या रेल्वे स्थानकांवर केमिस्ट स्टॉलसाठी कमाल १०८ चौरस फुटांची जागी पर्याप्त मानली जाईल.

परंतू, आता रेल्वेच्या वतीने सिर्फ केमिस्ट दुकान उघडू दिले जात नाही. कारण यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी नियमात बदल केले आहेत.

रेल्वेच्या नवे नियमानुसार आता औषधाच्या दुकानांना मल्टी पर्पज स्टॉलमध्ये बदलण्यात आले आहेत. आधी तीन प्रकारच्या दुकानांना मंजरी दिली जात होती. ज्यात बुकस्टॉल,केमिस्ट स्टॉल आणि वेग-वेगळ्या सामानांच्या विक्रीच्या दुकानांचा समावेश होता. मात्र, यामुळे प्रवाशांची फलाटांवर गर्दी होत होती. आणि प्रवाशांना अडचण होत होती. त्यामुळे आता तीन दुकानाना एकत्र करुन मल्टी पर्पज स्टॉल उघडले जात आहेत. म्हणजे आता स्थानकांवर औषधांच्या दुकानांच्या जागी मल्टीपर्पज स्टॉल उघडले जात आहेत.

या स्टॉल्सवर डॉक्टरांच्या पावती शिवाय विकणारी सर्वसामान्य औषधे विकली जातील. आता नव्याने कोणत्याही स्वतंत्र औषधांच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. या शिवाय सरकार आता अनेक स्थानकांवर जन औषधी केंद्र उघडण्याचा विचार करत आहे. ए वन स्थानकात आरोग्य सुविधा वाढवण्याचा देखील विचार सुरु आहे. सध्या भारतात केवळ २१ रेल्वे स्थानकांवरच स्वतंत्रपणे मेडिकल स्टोअर्स सक्रीय आहेत.

इमर्जन्सीत काय करावे ?

रेल्वेचे टीटीई, ट्रेन गार्ड, सुप्रिटेंडन्ट, स्टेशन मास्तर आदींना प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिलेले असते. सर्व रेल्वे स्थानकांच्या जवळ रुग्णालयाची आणि डॉक्टरांची यादी आणि त्यांचे नंबर लिहिलेले असतात. येथे तुम्हाला मदत मिळू शकते. तसेच ट्रेन आणि स्टेशन मास्तराच्या कार्यालयात मेडिकल बॉक्स देखील पुरवण्यात आले आहेत.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा