
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांशी वेगवेगळ्या अंदाजात कनेक्ट होतेय.

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

आता हिंदी चित्रपट ‘मलंग’ला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्त तिनं काही फोटो शेअर केले आहेत.

मलंगच्या सेटवरील हे फोटो आहेत. शुटिंगदरम्यान केलेली धमाल या फोटोंमधून दिसतेय.
