AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 7 ते 9 मधील विजयी उमेदवार कोण?

Thane Municipal Corporation TMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात, आठ आणि नऊमधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 7 ते 9 मधील विजयी उमेदवार कोण?
tmc Election Results Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 22, 2025 | 9:40 PM
Share

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.

Ward No. 7

प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेल्यावेळी तीन जागांवर शिवसेनेनं आणि एका जागेवर काँग्रेसने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सातमध्ये नौपाडा आणि वागळे इस्टेट या प्रमुख भागांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 58393 इतकी आहे. त्यापैकी 7103 एवढी अनुसूचित जातीची तर 1399 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारपैकी तीन जागांवर शिवसेनेनं आणि एका जागेवर काँग्रेसने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सात अ मधून शिवसेनेचे उमेदवार विमल भोईर विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 4 ब मधून शिवसेनेच्या कल्पना पाटील या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्याच राधिका फाटक यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रेसचे विक्रांत चव्हाण विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
7 (अ)
7 (ब)
7 (क)
7 (ड)

Ward No. 8

प्रभाग क्रमांक 8 मध्ये गेल्यावेळी चार जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक आठमध्ये हिरा आनंदानी मेडोज, धर्मवीर नगर, सुभाष नगर, लोक उपवन, तुलशीधाम, BSUP इमारती, लोकपुरम, गोदरेज सोसायटी, अॅक्मे ओझोन, दोस्ती इम्पेरिया, वरुण गार्डन, हाईड पार्क आणि काशिनाथ घणेकर नाट्यगृह या प्रमुख भागांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 57854 इतकी आहे. त्यापैकी 4475 एवढी अनुसूचित जातीची तर 828 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक आठ अ मधून शिवसेनेचे उमेदवार देवराम भोईर विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 4 ब मधून शिवसेनेच्या उषा भोईर या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्याच निशा पाटील यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे संजय भोईर विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
8 (अ)
8 (ब)
8 (क)
8 (ड)

Ward No. 9

प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक नऊमध्ये बाळकुम, राम मारुती नगर, आणि रुणवाल गार्डन सिटी यांसारख्या प्रमुख भागांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 62268 इतकी आहे. त्यापैकी 5756 एवढी अनुसूचित जातीची तर 1064 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
9 (अ)
9 (ब)
9 (क)
9 (ड)

2017 मध्ये या प्रभागात चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक नऊ अ मधून शिवसेनेचे उमेदवार गणेश कांबळे विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 9 ब मधून शिवसेनेच्या अनिता गौरी या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्याच विजया लासे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे उमेश पाटील विजयी झाले होते.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.