AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Cricket : भारतीय खेळाडूंची चांदी, मॅच फीमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ, Bcci चा मोठा निर्णय, आता किती मिळणार?

BCCI Revises Pay Structure: बीसीसीआयने एक मात्र ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला खेळाडू, पंच आणि सामनाधिकाऱ्यांना लॉटरी लागली आहे.

Indian Cricket : भारतीय खेळाडूंची चांदी, मॅच फीमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ, Bcci चा मोठा निर्णय, आता किती मिळणार?
BcciImage Credit source: Bcci Domestic X Acccount
| Updated on: Dec 23, 2025 | 12:31 AM
Share

कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियाला पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताच्या मुलींनी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आयसीसी, बीसीसीआय राज्य सरकारकडून या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातील कुणाला गाडी बक्षिस म्हणून देण्यात आली. तर कुणाला सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. अशात बीसीसीआयने वूमन्स क्रिकेटसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या महिला खेळाडूंच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारा निर्णय घेतलाय. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही समसमान मॅच फी मिळणार आहे.

महिला खेळाडूंना आता किती मॅच फी मिळणार?

बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याने आता मेन्स आणि वूमन्स खेळाडूंची मॅच फी समसमान झाली आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटू आणि सामनाधिकारी (Match Referee) यांच्या मॅच फीमध्ये तब्बल दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. त्यानुसार आता वनडे आणि मल्टी डे मॅचेससाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये असलेल्या खेळाडूंना एका दिवसासाठी 50 हजार रुपये मिळणार आहेत. तर राखीव खेळाडूंना 25 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

बीसीसीआयच्या निर्णयामुळे खेळाडू मालामाल

एका टी 20 सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना प्रत्येकी 25 तर इतर खेळाडूंना साडे 12 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याआधी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना 20 तर इतर खेळाडूंना 10 हजार रुपये मानधन देण्यात येत होतं.

तसेच ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेतील महिला खेळाडूंनाही समसमान मानधन दिलं जाणार आहे. त्यानुसार वनडे आणि मल्टी डे सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना प्रतिदिन 25 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. तर राखीव खेळाडूंना 12 हजार 500 रुपये मिळणार आहेत.

तर टी 20 सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील प्रत्येकीला साडे 12 हजार तर इतर खेळाडूंना (प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसलेले) 6 हजार 250 इतकं मानधन मिळणार आहेत.

पंच आणि सामनाधिकाऱ्यांनाही फायदा

खेळाडूंसह पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. पंच आणि सामनाधिकाऱ्यांना देशांतर्गत स्पर्धेतील साखळी फेरीतील क्रिकेट सामन्यासाठी प्रतिदिन 40 तर बाद फेरीतील सामन्यासाठी 50-60 हजार रुपये मिळणार आहेत.

तसेच या वाढीनुसार, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील एका सामन्यासाठी 1 लाख 60 हजार तर बाद फेरीतील सामन्यासाठी अडीच ते 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.