
श्रावण महिन्यात अनेक जण शाकाहार घेतात. या शिवाय कांदा आणि लसूण देखील खात नाहीत. श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण का खाऊ नये ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. ( Credit : Getty Images )

श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण न खाण्याची धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक दृष्टीने दोन्ही तामसिक अन्न आहे. तर वैज्ञानिकदृष्टकोन सांगताना जयपूरचे आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता म्हणाले की, पावसाळ्यात पचनक्रिया थोडी कमकुवत होते.

कांदा आणि लसूण हे उष्ण अन्न आहे. यामुळे पोटात उष्णता निर्माण होते आणि पचण्यास त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात पचनाच्या समस्या उद्भवते. पोटात गॅस, उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते.

इतकंच काय तर या काळात पालेभाज्या आणि वांगी देखील खाऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. आर्द्रतेमुळे वातावरणात बॅक्टेरिया असतात. डास आणि किटकांचं प्रमाण अधिक असते. त्यामळे पालेभाज्या आणि वांग्यावर कीटक पडतात. तसेच वांगी पचण्यास कठीण असते.

न्यूट्रिशनिस्ट डॉ. गितिका यांच्या मते, पावळ्यात हळद, तूळस किंवा आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. या ऋतूत दुधी, पडवळ आणि भोपळ्यासारख्या इतर भाज्यांचा आहारात समावेश करावा.

तुम्ही तुमच्या आहार या काळात हलका घ्यावा. खिचडी किंवा वरण भात खाऊ शकता. इतकंच काय तर फळ आहार करताना फळं स्वच्छ दोन तीन धुवून घ्या.