AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, राज ठाकरेंकडून दखल; सरकारला घाम फोडणारी केली मागणी

पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने कित्येक तास कोंडी झाली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, प्रवाशांचे मोठे हाल झाले. याच पार्श्वभूीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत मोठी मागणी केली आहे.

Raj Thackrey : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, राज ठाकरेंकडून दखल; सरकारला घाम फोडणारी केली मागणी
राज ठाकरे यांची मोठी मागणी
| Updated on: Feb 05, 2026 | 11:12 AM
Share

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) ज्वनशील रसायन घेऊन जाणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी उलटा,त्यामुळे तब्बल 32 तास हा महामार्ग ठप्प होता. यामुळे अनेक वाहनं अडकून पडली. कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यातल प्रवाशांचेही मोठे हाल झाले. यामुळे मोठा गदारोळ झाला. अंधारलेले रस्ते, अनेक तास न हलणारी वाहन, रडणारी मुलं, खाणं तर सोडा, पण प्यायला पाणीही न मिळाल्याने प्रवाशांचे झालेले हाल यामुळे लोकांची प्रचंड फरपट झाली.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत टीका केली आहे. अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीत टीकास्त्र सोडलं आहे. ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहीलेली पोस्ट जशीच्या तशी ..

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का? हा प्रश्न आहे.

मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.

हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.

राज ठाकरे ।

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश