
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहिला जातो. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. आता हा कार्यक्रम पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील विनोदवीरांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामधील एक म्हणजे ओंकार भोजने. पण त्याने काही कारणास्तव शो सोडला होता. आता तो पुन्हा शोमध्ये दिसणार आहे.

'अगं अगं आई...' असो किंवा 'साइन कॉस थिटा' ओंकार वेगवेगळ्या स्कीटमधून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तो कोकण कोहिनूर या नावाने ओळखला जातो.

मधल्या काळात ओंकारने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडला होता. त्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण आता ओंकार पुन्हा शोमध्ये दिसणार आहे.

ओंकारने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी भागात ओंकार दिसणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला आहे.