महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीबाणा या खास कार्यक्रमाचे आयोजन, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

| Updated on: May 02, 2023 | 10:08 AM

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची आवई उठवली जाते, मात्र प्रत्यक्षात मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही हेच सत्य असल्याचे निक्षून सांगितले.

1 / 6
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेना कळवा, खारीगाव, विटावा शाखेच्या वतीने कळवा पश्चिम येथील ९० फिट मार्ग येथे अशोक हांडे यांच्या मराठीबाणा या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत मांडले. राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असल्याचे यासमयी सांगितले.

2 / 6
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ३१७ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. तसेच एसटीमध्ये १०९ वातानुकूलित ई-शिवनेरी बसेस दाखल करण्यात आल्या असल्याचे नमूद केले. मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले असल्याचेही यावेळी सांगितले. मुंबई शहर खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले.

3 / 6
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची आवई उठवली जाते, मात्र प्रत्यक्षात मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही हेच सत्य असल्याचे निक्षून सांगितले.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची आवई उठवली जाते, मात्र प्रत्यक्षात मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही हेच सत्य असल्याचे निक्षून सांगितले.

4 / 6
तसेच महायुती सरकारच्या कामाचा झपाटा सहन होत नसल्यानेच विरोधकांची पोटदुखी वाढली असून त्यांच्या पोटात बुरगुंडा झाला आहे. हा बुरगुंडा दूर करण्याचे काम आपला दवाखाना नक्कीच करेल असेही यावेळी सांगितले.

5 / 6
आम्ही टीकेला टिकेने नव्हे तर कामाने उत्तर देतो कळवा खारीगाव विभागासाठी आजवर १०४ कोटी दिले असून त्यातून या भागात अनेक विकासकामे केली आहेत. हा ९० फिट मार्ग देखील लवकरच पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याद्वारे या भागात राहणाऱ्या रहिवाशांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल असेही यावेळी बोलताना जाहीर केले.

6 / 6
याप्रसंगी विटावा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता संतोष तोडकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  यासमयी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना महिला आघाडी संघटिका लता पाटील, माजी नगरसेवक राम रेपाळे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, चौरंगचे अशोक हांडे, माजी नगरसेविका सौ.मालती पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक राजन किणे तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कळवा, खारीगाव, विटावा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.