‘आई माऊलीचा उदो उदो’ जयघोषात एकविरा देवी उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

| Updated on: Apr 09, 2022 | 9:01 AM

हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका. एकविरा माता म्हणजेच परशुरामाची माता होय. चैत्र महिन्यात या देवीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

1 / 6

2 / 6
या उत्सवा निमित्ताने पुण्यातील राजगुरूनगर येथे  एकविरा देवी ट्रस्ट, ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजगुरूनगर मधील शहरातून अनेक महिलांनी कलश घेऊन एकविरा देवीची पालखी काढली.

3 / 6
 या पालखीमध्ये  हारतुरे,अभिषेक, महाप्रसाद, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्याच प्रमाणे रथ मिरवणूक देखील काढण्यात आली . गेली दोन वर्षे कोरोना मुळे यात्रा होऊ शकली नाही मात्र आता या उत्सवामध्ये महिलाच्या चेहऱ्यावर ऐक वेगळा आनंद पाहायला मिळत आहे

4 / 6
महाराष्ट्रात देवींची जी साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी. लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे.

5 / 6
आई एकविरेचे मंदिर  कार्ला गडावर स्थित असून ते एक स्वयंभु मंदिर असून अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेन्दुंर चर्चीत” आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सावाच्या यात्रा होतात.

6 / 6
मंबई-पुणे महामार्गावर (110 कि.मी.) लोणावल्याजवळ मळवली रेल्वे स्थानकापासून उत्तरेस पाच कि.मी. अंतरावर वाकसईजवळ कार्ला फाट्यावरून ३ कि.मी. अंतरावर कार्ला गड आहे. कार्ला फाट्यावर विश्वस्त मंडळाने बांधलेला भव्य व रेखीव प्रवेशव्दार आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हे स्थान समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर आहे. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा परंपरा देखील आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.