
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा स्टारर 'एक्यूज्ड' सिनेमा 27 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात कोंकणा डॉक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात सुकांत गोयल, आदित्य नंदा आणि प्रतिभा रांता देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.

सिक्रेट स्टोरीज - रोझलिन - जिओ प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. ही मल्याळम भाषेतील सायकॉलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. रोझलिनच्या आयुष्याची ही कहाणी तुम्ही 27 फेब्रुवारीपासून जिओ प्लस हॉटस्टारवर पाहण्यास सुरुवात करू शकता. सुमेश नंदकुमार दिग्दर्शित या मालिकेत संजना दीपू, विनीत आणि मीना यांच्या भूमिका आहेत.

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम सिनेमा ZEE5 प्रदर्शित झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर, अमेय वाघ, कादंबरी कदम आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्राजक्ता कोळी सिनेमातून मराठीत पदार्पण केलं आहे.

ब्लॅक फोन 2 सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी जिओ प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा एक हॉरर-कॉमेडी सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं नाव ब्लॅक फोन 2 आहे आणि तुम्ही तो 28 फेब्रुवारीपासून जिओ प्लस हॉटस्टारवर सिनेमा पाहू शकता. हा सिनेमा चार वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

सुबेदार सिनेमा प्राइम व्हिडिओवर 5 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर अॅक्शन मोडमध्ये दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात सौरभ शुक्ला, फैसल मलिक, मोना सिंग, आदित्य रावल आणि राधिका मदन मुख्य भूमिकेत आहेत.