

या गावात स्वचा शोध घेण्यासाठी, शांत आणि गाढ झोपण्यासाठी हजारो पर्यटक येतात. या गावात शांती आहे. निसर्ग आहे. या सानिध्यात लोकांच्या काळजावर निसर्ग फुंकर घालतो. त्यांना ताजंतवाणं करतो.

स्वीडनमध्ये हळूहळू स्लीप टुरिझम प्रचलित होत आहे. स्वीडिश द्वीप समूहातील काही गावात केवळ झोपण्यासाठी लोक येतात. येथे आल्यावर आयुष्यभराचा थकवा ते घालवतात.

बीबीसी वृत्तानुसार, स्वीडनमध्ये आलिशान आणि नैसर्गिक वातावरणात शांत झोपेची ही संकल्पना रूजू लागली आहे. निसर्गाच्या कुशीत पहुडण्याची संधी शोधत अनेक पर्यटक येथे येत आहेत.

साधारण खोली, आरामदायक बिछाना, एक खुर्ची, टेबल, उघडी खिडकी आणि समोर भव्य असा निसर्ग असे वातावरण पर्यटकांना खुणावत आहे. येथे ना टीव्ही, ना इंटरनेट, शांती, निसर्ग आणि तुमची झोप याशिवाय चौथं कोणी नाही.