पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; आता सुरू करणार नवी इनिंग

पाकिस्तानची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाजने नुकतीच मोठी घोषणा केली आहे. तिने 13 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

| Updated on: Oct 04, 2026 | 8:41 PM
1 / 5
पाकिस्तानची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) महिला अंडर-19 टी-20 स्पर्धेत तिने मॅच रेफरीची भूमिका पार पाडली होती.

पाकिस्तानची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) महिला अंडर-19 टी-20 स्पर्धेत तिने मॅच रेफरीची भूमिका पार पाडली होती.

2 / 5

यानंतर आता क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द थांबवून मॅच रेफरी म्हणून नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय कायनातने घेतला आहे. कायनातने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

3 / 5

2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. आपल्या कारकिर्दीत तिने पाकिस्तानकडून 19 वनडे सामन्यांत 10 विकेट्स आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या.

4 / 5

कायनात इम्तियाजच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे आले. ती 2010 आणि 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या संघाचा भाग होती. तसेच 2017 च्या महिला विश्वचषक आणि 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.

5 / 5

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्याने कायनात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होती. या काळात तिने कॉमेंट्री आणि क्रिकेटशी संबंधित इतर कामांमध्येही सहभाग घेतला. अशातच आता तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us