
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने सानिया मिर्झाला घटस्फोट देत तिसऱ्यांदा तो विवाहबंधनात अडकला. आता परत एकदा शोएब त्याच्या नवीन पत्नीच्या वाढदिवसामुळे चर्चेत आला आहे.

शोएब मलिक याने तिसऱ्या पत्नीसोबत वाढदिवस मोठा थाटामाटात साजरा केला आहे. सना जावेद आणि शोएब या दोघांनी मिळून केक कट केला.

सना जावेद हिचा वाढदिवस होळीच्या दिवशी होता. शोएबने वाढदिवसासाठी मोठं आयोजन न करता दोघांमध्येच बर्थ डे सेलिब्रेट केला.

लग्न झाल्यावर सना जावेदचा पहिलाच वाढदिवस होता. सना जावेद आणि शोएब मलिक यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सानिया मिर्झानेच याला शोएब मलिकला घटस्फोट दिला होता. सना जावेद हिचासुद्धा दुसरा विवाह आहे. दोघांच्या वाढदिवसाचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली.