पाकिस्तानी क्रीम नव्हे हे तर विष, गोरं होण्यासाठी बायका करत होत्या वापर, चाचणीनंतर धक्कादायक बाब उघड!

रिपोर्टनुसार या क्रीमचा वापर केल्यानंतर नागपुरातील 18 महिलांना मुंत्रपिंडविषयक समस्या निर्माण झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या क्रीमची चाचणी केली. या क्रीममध्ये मर्क्यूरीसारखा हानिकारक घटक आढळून आला आहे.

| Updated on: Jul 05, 2026 | 9:32 PM
1 / 5
पाकिस्तानातील एक क्रीम सध्या भारतात पूर्णपणे बॅन झाली आहे. ही क्रीम लावल्यावर संबंधित व्यक्ती गोरी होते, असा दावा केला जात होता. या क्रीमचे नावदेखील गोरी ब्यूटी क्रीम असे आहे. या क्रीममध्ये शरीराला इजा पोहोचवणारे घटक असल्याचे समोर आले आहे.

2 / 5

रिपोर्टनुसार या क्रीमचा वापर केल्यानंतर नागपुरातील 18 महिलांना मुंत्रपिंडविषयक समस्या निर्माण झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या क्रीमची चाचणी केली. या क्रीममध्ये मर्क्यूरीसारखा हानिकारक घटक आढळून आला आहे.

3 / 5

त्यानंतर पाकिस्तानातील गोरी क्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही क्रीम जप्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात छापेमारी केली जात आहे. नागपुरातील महिलांनी ही क्रीम ई-कॉमर्स साईटवरून मागवल्याचे सांगितले जात आहे. महिला साधारण दोन वर्षांपासून या क्रीमचा वापर करत होत्या.

4 / 5

सूत्रांच्या माहितीनुसार या क्रीमवर एक्स्पायरी डेटदेखील दिलेली नाही. या क्रीमच्या वापरानंतर शरीरावर अनेक घातक परिणाम होतात, असे तपासणीतून समोर आलेले आहे. म्हणूनच या क्रीमची खरेदी करू नये तसेच या क्रीमचा वापरही टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

5 / 5

दरम्यान, या गोरी ब्यूटी क्रीमविरोधात प्रशासनाने मोहीम उघडली आहे. मुंबईतील पोलिसांनी चेंबूरमधील एका दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंदी असूनही त्या दुकानदाराकडून गोरी क्रीम विकली जात होती, असे सांगितले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us