
सध्या बऱ्याच देशांनी ‘टिकटॉक’वर बंदी आणली आहे. अशातच पाकिस्तानी चाहत्यांना आणखी एका धक्का बसला आहे.

पाकिस्तानची प्रसिद्ध ‘टिकटॉक’स्टार जन्नत मिर्झाने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जन्नत मिर्झा पाकिस्तानातील सगळ्यात प्रसिद्ध ‘टिकटॉक’स्टार आहे.

तिचे ‘टिकटॉक’वर जवळपास 10 मिलिअन चाहते आहेत.

जन्नत पाकिस्तानला ‘अलविदा’ म्हणून जपानमध्ये स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिला या संदर्भात प्रश्न विचारले जात होते.

या प्रश्नांवर एका चाहत्याला जन्नतने उत्तर दिले आहे. ‘पाकिस्तान खूप चागला देश आहे. मात्र, इथल्या लोकांची मानसिकता खराब आहे’, असे म्हणत तिने देश सोडून जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

खरेतर पाकिस्तानमध्येही ‘टिकटॉक’वर बंदी आल्याने ती देश सोडून जात असल्याचे म्हटले जाते आहे.

कारण काहीही असो, मात्र तिच्या या निर्णयाने पाकिस्तानी चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.