
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्निक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली.

यंदा मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून अहमदनगरमधल्या काळे दांपत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.

मागच्या 25 वर्षांपासून वारीत सहभागी होणारं भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य आज मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी झालं होतं.

यावेळी तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ देत, असं साकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.

या महापूजेवेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील सपत्नीक उपस्थित होते.