
हेरी फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. परत एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार याच्याऐवजी कार्तिक आर्यन हा चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा होती.

आता यावर परेश रावल यांनी मोठा खुलासा हा केला आहे. परेश रावल यांनी स्पष्ट केले की, कार्तिक आर्यन हा हेरी फेरी 3 चित्रपटात अक्षय कुमार याची जागा घेणार नव्हता.

कार्तिक आर्यन हा वेगळ्याच एका हटके भूमिकेमध्ये दिसणार होता. कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार याच्या भूमिकेचा काहीच संबंध नव्हता.

अक्षय कुमार याने हेरी फेरी 3 चित्रपला नकार दिल्यानंतर निर्माते कार्तिक आर्यन याच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसली होती.

अक्षय कुमार याने थेट सांगितले होते की, मला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला आहे. मात्र, अचानकपणे सर्वांना मोठा धक्का देत अक्षय याने चित्रपटाला होकार दिला.