परेश रावल यांची पत्नी अत्यंत सुंदर, ‘मिस इंडिया’चा जिंकलाय किताब; 17 व्या वर्षी बनलेली हिरोइन
अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर फारशी चर्चा होत नाही. त्यांची पत्नी कोण आहे, ते जाणून घ्या..

अभिनेते परेश रावल यांच्या पत्नीने ऐंशीच्या दशकात बॉलिवूडमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. करिअरमध्ये त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. कॉमेडीमध्ये तर त्यांचा हातखंडा आहे. पण सौंदर्याच्या बाबतीतही त्यांनी त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर दिली होती.

परेश रावल यांची पत्नी दुसरी-तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री स्वरुप संपत आहे. एकेकाळी त्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. स्वरुप यांनी 'मिस इंडिया'चाही किताब जिंकला होता. 1979 मध्ये त्यांनी 'मिस इंडिया'चा मुकूट आपल्या नावे करून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती.

अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी समाजसेवेतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परेश रावल हे त्यांच्या अचूक विनोदाच्या टायमिंगसाठी आणि दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखले जातात. तर त्यांची पत्नीसुद्धा अभिनयासोबतच कॉमेडी भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या.

'मिस इंडिया'चा किताब जिंकल्यानंतर त्यांनी मॉडेलिंगसोबतच फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलं. त्यांनी 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांनी 'नाखुदा' या चित्रपटात स्वरुप यांना संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी 'नरम गरम' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली.

स्वरुप संपत यांनी त्यांच्या करिअरमध्ये 'नरम गरम' (1981), नाखुदा (1981), हिम्मतवाला (1983), 'करिश्मा' (1984), साथिया (2002) यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर त्यांनी शिक्षण आणि समाजसेवेकडे अधिक लक्ष दिलं.