‘तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील’, इंडस्ट्रीमध्ये काम देण्यासाठी दिग्दर्शकाची अश्लील मागणी, अभिनेत्रीने थेट..
'तुला माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील', इंडस्ट्रीमध्ये काम देण्यासाठी एका दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे मागणी. अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक.

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीता बोरठाकुर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या काळातील धक्कादायक अनुभव उघड केला आहे. तिने सांगितले की, दक्षिण चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी तिला एका दिग्दर्शकाकडून अयोग्य मागणीचा सामना करावा लागला होता.

परिणीताने सांगितले की, तिचे फोटो शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तिला चित्रपटासाठी बोलावण्यात आले. तिथे अनेक मुली ऑडिशनसाठी उपस्थित होत्या. काही वेळाने तिला चित्रपटासाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले.

मात्र, करार करण्याआधी संबंधित दिग्दर्शकाने तिच्याशी वैयक्तिकरित्या बोलताना 'आपल्यामध्ये शारीरिक संबंध असावेत' अशी मागणी केली. त्या वेळी ती केवळ 21 वर्षांची होती. दिग्दर्शकाचे हे शब्द ऐकून ती हादरली आणि तत्काळ त्या ठिकाणाहून निघून गेली.

नंतर त्या दिग्दर्शकाने फोन करून ही बाब कुणालाही सांगू नये अशी विनंती केली. स्वतःला 'फॅमिली मॅन' असल्याचे सांगत त्याने पुन्हा चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली, मात्र परिणीताने ती स्पष्टपणे नाकारली.

या अनुभवाबद्दल बोलताना परिणीताने सांगितले की, कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध कोणीही त्याला स्पर्श करू शकत नाही आणि अशा परिस्थितीत स्वतःचा ठाम स्वभाव व स्पष्ट भूमिका महत्त्वाची ठरते. काम मिळवण्यासाठी तिने कधीही चुकीचा मार्ग स्वीकारला नसल्याचेही तिने स्पष्ट केले.