
परिणीती चोप्रा, काजल अग्रवाल सह अनेक स्टार्सनी करवा चौथच्या सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. या स्टार्सनी आपल्या हातावर मेहंदी काढलीये त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

परिणीती चोप्रा : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे नेते राघव चड्ढा यांनी नुकतेच लग्न गाठ बांधली. अभिनेत्रीचा हा पहिलाच करवा चौथ असून तो ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये सेलिब्रेट करत आहे. राघवच्या नावाने अभिनेत्रीने लावलेल्या मेहंदीचे डिझाइन अतिशय अनोखे आहे. त्यात मुलगी दिसत आहे.

अभिनेत्री काजल अग्रवालने इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात ती तिची मेहंदी डिझाइन दाखवताना दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. काजलने साधी मेहंदी लावली आहे..

महीप कपूर : संजय कपूरची पत्नी महीप कपूरनेही हातावर मेहंदी काढलीये. महीपने बारीक डिझाइन असलेली मेहंदी हातावर काढलीये.

अभिनेत्री देबिना बॅनर्जी आपल्या देसी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. करवा चौथला ही अभिनेत्री मेहंदी लावताना दिसली. देबिनाने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.