
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मनु भाकर हिने पदकांचं खातं उघडलं आहे. 10 मीटर एयर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं पहिलं पदक आहे.

ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. अंतिम फेरीत ती तिसऱ्या स्थानावर राहिली. मनूने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

मेडल जिंकल्यावर मनु भाकर हिने आपली पहिली प्रतिक्रिया देताना श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेली गोष्ट डोक्यात असल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढले, हे कांस्य आहे पण मला आनंद आहे की मी देशासाठी कांस्य पदक जिंकू शकले. मी गीता खूप वाचली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यानुसार तुमच्या कर्मावर फोकस ठेवा त्याच्या परिणामावर नाही. मीसुद्धा तेच केल्याचं मनु भाकर म्हणाली.

टोकियो ऑलिम्पिकनंतर मी खूप निराश झाले होते. पण मी चांगलं कमबॅक केलं. भूतकाळात जे काही झालं ते सोडून द्या. पण आज मला काय वाटत आहे हे मी शब्दात सांगू शकत नसल्याचं मनु भाकर म्हणाली.

गगन नारंग आणि विजय कुमार या दोघांनी 2012 मध्ये सिलव्हर मेडल