Parmanand Maharaj: सगळेच रस्ते बंद, अपयश पिच्छा सोडेना? प्रेमानंद महाराजांचा हा मंत्र तारून नेणार

Parmanand Maharaj Success Mantra: जीवनात अनेकदा संकट संधी साधून येतात आणि परत जाण्याचे नाव घेत नाहीत. अशावेळी संयम सुटतो. सगळेच रस्ते बंद झाल्यावर निराशा येणारच. अशावेळी प्रेमानंद महाराजांचा हा मंत्र तुम्हाला नक्की मदत करेल.

| Updated on: Feb 19, 2026 | 5:37 PM
1 / 6
नैराश्य, अपयश कधी कधी पिच्छा सोडत नाही. कितीही चांगले काम करा, अडथळे येतात. सगळेच रस्ते बंद झाल्यावर माणूस हरल्यासारखा होतो. मग काहीच सुचत नाही. अशावेळी प्रेमानंद महाराजांचा हे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

नैराश्य, अपयश कधी कधी पिच्छा सोडत नाही. कितीही चांगले काम करा, अडथळे येतात. सगळेच रस्ते बंद झाल्यावर माणूस हरल्यासारखा होतो. मग काहीच सुचत नाही. अशावेळी प्रेमानंद महाराजांचा हे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

2 / 6

सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजाचे अबालवृद्ध चाहते आहे. जर तुम्हाला सुद्धा हिम्मत हारल्यासारखं वाटत असेल तर प्रेमानंद महाराजांचा हा सल्ला, हे विचार तुम्हाला नक्कीच हुरूप आणतील. तुमच्यावर कितीही संकट आले तरी तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही.

3 / 6

एका भक्ताने त्यांना याविषयीचा प्रश्न केला होता. जर एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करत असेल. देवाचं नामस्मरण करत असेल आणि तरीही तो अपयशी ठरत असेल तर अशावेळी काय करायला हवे असा प्रश्न त्या व्यक्तीने विचारला.

4 / 6

जर एखाद्या व्यक्तीला वारंवार प्रामाणिक प्रयत्न करूनही, अपयश येत असेल तर हे त्याचे मागील पापकर्म असू शकते असे प्रेमानंद महाराज म्हणाले. मागील जन्मातील काही पापकर्म या जन्मात सच्चा मनुष्यालाही सतावतात. ते ज्या कामात हात घालतील तिथं त्यांना अपयश येतं.

5 / 6

असेच अपयश येत असेल तर त्या व्यक्तींनी देवाचं नामस्मरण वाढवावं, देवाची करुणा भाकावी. देवावर विश्वास ठेवावा आणि विश्वासाने देवाचे अधिक नामस्मरण करावे. तर त्याचे कष्ट कमी होतील. त्याचे अपयशाचे ढग नाहीसे होतील असा विश्वास प्रेमानंद महाराजांनी व्यक्त केला.

6 / 6

डिस्क्लेमर: सदर माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us