AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीरियड्स सुरू होते पण..; पुणे-मुंबई महामार्गावर 9 तास अडकलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था

पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल नऊ तास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली होती. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. तिला मासिक पाळी आली होती, पण वॉशरुमलाही जाता येत नव्हतं.

पीरियड्स सुरू होते पण..; पुणे-मुंबई महामार्गावर 9 तास अडकलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था
Dhanashri Kadgaonkar Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2026 | 11:46 AM
Share

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे दोन्ही महामार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली होती. पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे आणि महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशाच एका वाहनात मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगांवकर अडकली होती. धनश्रीची गाडी तब्बल नऊ तास या महामार्गावर अडकून पडली होती. त्यात तिला मासिक पाळी आली होती आणि गाडी अडकल्यामुळे ती बाथरुमलाही जाऊ शकत नव्हती.

धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची एक पोस्ट लिहिली आहे. त्याचसोबत महामार्गाचा व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. तब्बल नऊ तासांच्या प्रवासानंतर धनश्री तिच्या शूटिंगच्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचली. देवापुढं इतकीच प्रार्थना की कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नको, अशी प्रार्थना तिने केली.

धनश्रीची पोस्ट-

‘मी नेहमीच दुसऱ्या बाजूला असायचे, म्हणजे मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिकच्या बातम्या बघणं असो किंवा काही अपघात, दरड कोसळणं असो.. पण काल (6 जुलै 2026) मी अशाच एका घटनेचा भाग होते. अशा पद्धतीने अडकणं हे अत्यंत थकवणारं आणि त्रासदायक असतं. मला मासिक पाळी आली होती. वॉशरुमला जाण्याची मला तीव्र इच्छा होती, पण मी जाऊ शकत नव्हते. फुड कोर्टवर उतरून काहीतरी खायचं होतं, पण तेही करू शकत नव्हते,’ अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला.

धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ-

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘गुडघाभर पाणी साचलं होतं, कुठं ओलं व्हा, आजारपण आता परवडणारं नाही, कारण खूप शूट लागलं आहे. मॅडम पुण्याला परत जाऊया, असं माझं ड्राइव्हर बोलत होता. पण कलाकार हे त्यांच्या कमिटमेंटबद्दल खूप काळजी घेतात आणि टेलिकास्ट अडकला होता. अखेर हळूहळू का होईना मी सुरक्षितरित्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले. निसर्गापुढे कोणाचं काहींचं चालत नाही, पण देवापुढं इतकीच प्रार्थना की कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नको. प्रत्येकाने सुरक्षित राहा.’ धनश्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?

7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक.

7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक

Soft Roti: चपात्या तव्यावरून काढताच कडक किंवा वातड होतात? ना मिठ, ना पाणी कणिक मळतानाच ‘हे’ दोन पदार्थ मिसळा.

Soft Roti: चपात्या तव्यावरून काढताच कडक किंवा वातड होतात? ना मिठ, ना पाणी कणिक मळतानाच ‘हे’ दोन पदार्थ मिसळा