AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, सरकारच्या मनात काय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच सांगितलं

Christian missionaries Lands Inspected: राज्य सरकाराने एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार आहे. विधानसभेत याविषयीची मोठी घोषणा करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नावर मोठे वक्तव्य केले. सरकारच्या मनात आहे तरी काय?

मोठी बातमी, राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, सरकारच्या मनात काय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच सांगितलं
चंद्रशेखर बावनकुळे, ख्रिश्चन मिशनरी जमीनImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 08, 2026 | 11:35 AM
Share

Chandrashekhar Bawankule big Statements: राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनीची तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून ही तपासणी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नाशिक मधील ख्रिश्चन मिशनरी च्या नावावर असलेल्या जमिनीचे अभिलेख तपासले जातील. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जमाबंदी आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी आणि आयजीआर मधील अधिकारी यांची समिती या प्रकरणाचा तपास करेल. यामधील खाजगी जमिनी शासनाच्या ताब्यात घेण्याचा विचार केला जाईल. ज्या ठिकाणी रहिवासी किंवा शासकीय बांधकाम आहे त्याबाबत वेगळा विचार केला जाईल. पुढील तीन महिन्यात उच्चस्तरीय चौकशी करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व जमिनीची मालकी तपासणार

धुळे मध्ये परप्रांतीय लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप विधानसभेत करण्यात आला. खरेदीसाठी फॉरेन फंडिंग झाल्याचाही आरोप अनुप अग्रवाल यांनी केला. शेतकरी असल्याशिवाय जमीन घेता येणार नाही. धुळ्यातील पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल. राज्यातील सर्व जमिनीची मालकी आता तपासली जाणार आहे. जमाबंदी आयुक्तांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

शेतकरी नसताना जमीन खरेदी

धुळे जिल्ह्यातील कुळ कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की राज्यातील एखादी जमीन घेण्यासाठी तो शेतकरी असावा. मात्र शेतकरी नसतानाही जमीन खरेदी सुरू आहे.जयंत पाटील यांनी देखील काल उल्लेख केला आहे. मोपा एअरपोर्ट शेजारी देखील राज्याबाहेरील लोकांनी येऊन जमिनी विकत घेतल्या आहेत. राज्यातील हा आकडा शोधण्यासाठी जमाबंदी आयुक्त तपासणी करत आहेत. शेतकरी नसताना विकत घेतलेल्या जमिनीची आकडेवारी आम्ही घेत आहोत. कुणीही रजिस्ट्रेशन करायला आल्यावर त्याचा सातबारा राज्यात कुठे आहे? याचा संपूर्ण डेटा देण्याचा ॲक्सेस आपण मुद्रांक अधिकाऱ्यांना दिला आहे. धुळे जिल्ह्यात जर परप्रांतीय लोकांनी जमिनी घेतल्या असतील तर, तिथले विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांसोबत एक यंत्रणा तयार करून त्याची चौकशी केली जाईल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे