जगातील सर्वात उंच उडणारे विदेशी पक्षी बुलढाण्यात दाखल… पक्ष्यांचा हजारो किलोमीटरचा प्रवास

पक्षी कायम त्या भागातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. वातावरणात जसे बदल होतात, त्याप्रमाणे पक्षी देखील त्यांचा प्रवास सुरु करतात. आता जगातील सर्वात उंच उडणारे विदेशी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून बुलढाण्यात दाखल झाले आहेत. त्यांचे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अवाक् व्हाल

| Updated on: Jan 03, 2026 | 4:16 PM
1 / 5
बुलढाणा हे थंड हवेचे शहर म्हणून ओळखलं जातं, तर जिल्ह्यात तीन अभयारण्य आहेत ज्यामध्ये प्राणी आणि पक्षांसाठी अन्नसाखळीनुसार पोषक आणि पूरक वातावरण असल्याने विविध प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत..

2 / 5
मात्र सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पक्षी बुलढाण्यात दाखल झाले आहे.. ज्याचे पक्षी मित्रांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे..

3 / 5
बुलढाण्याच्या ढालसावंगी धरण परिसरात 'पट्टाकदंब' हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्षांपैकी एक पक्षी आहे. हे पक्षी मंगोलिया, रशिया कझाकिस्तान मधून  भारतामध्ये स्थलांतरित झाले आहेत..

4 / 5
हिमालय पर्वत ओलांडून ते भारतात प्रवेश करत असतात संपूर्ण हिवाळा भारतात वास्तव्य करून ते परत जातात.. सोबतच हिमालयात राहणारा 'चक्रवाक' नावाचा पक्षी देखील याच परिसरात दाखल झाला आहे, हा चक्रवाक पक्षी बहुदा जोडीमध्ये पाहायला मिळतो.

5 / 5