Diwali Bonus: तुम्हाला कायद्यानुसार किती बोनस मिळायला हवा? जाणून घ्या एका क्लीकवर

तुम्हाला कायद्यानुसार किती बोनस मिळायला हवा माहित आहे का? आज तेच जाणून घेणार आहोत, त्यासाठी खालील संपूर्ण माहिती नक्की वाचा.

| Updated on: Nov 03, 2026 | 3:30 PM
1 / 5
भारतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला Payment of Bonus Act, 1965 ह्या कायद्यानुसार आपल्या हक्काचा बोनस मिळण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत कंपनीमध्ये एका वर्षामध्ये सलग किंवा एकूण जवळपास तीस दिवस जरी काम केलं असेल तरीसुद्धा तुम्ही बोनस मिळण्यासाठी पात्र ठरता.

2 / 5

कंपनी नफ्यामध्ये असो किंवा तोट्यामध्ये. पात्र कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ पगाराच्या म्हणजे बेसिक पगार प्लस GA असा जवळपास आठ पूर्णांक ३३% बोनस मिळणं सुद्धा बांधकारक असतं.

3 / 5

साधारणपणे तुमच्या एका महिण्याच्या मूळ पगाराएवढा बोनस मिळायला हवा. कंपनीचा नफा चांगला असेल आणि कर्मचाऱ्याची उत्तम कामगिरी असेल. तर हा बोनस वाढवुन सुद्धा मिळतो.

4 / 5

तुमच्या मूळ पगाराच्या जास्तीत जास्त २० टक्क्यांपर्यंत दिला जाऊ शकतो. बोनसची हि रक्कम सामान्यतः वार्षिक वर्ष संपल्यानंतर आठ महिण्याच्या आत दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या काळामध्ये कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

5 / 5

जर कंपनीने नियमानुसार बोनस द्यायला नकार दिला, तर कर्मचारी काय करू शकतात तर कामगार आयुक्तांकडे म्हणजेच लेबर कमिशनरकडे तक्रार सुद्धा करू शकतात. त्यामुळे आपला हा हक्क प्रत्येक नोकरदारांना जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us