
आमिर खान हा नुकताच जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचला आहे. याचे आता काही फोटो व्हायरल होत आहे.

आमिर खान याचा यावेळीचा लूक पाहून लोकांनी थेट डोक्यालाच हात लावल्याचे बघायल मिळतंय. थेट रणवीर सिंह याच्यासोबत आमिरची तुलना केली जातंय.

आमिर खान हा अत्यंत अतरंगी अश्या लूकमध्ये जामनगरमध्ये दाखल झालाय. आमिर खानचा लूक पाहून लोक त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

अनेकांनी तर थेट रणवीर सिंह याचा परिणाम झाल्याचे देखील म्हटले आहे. लोकांना आमिर खानचा हा लूक अजिबातच आवडलेल्या दिसत नाहीये.

फक्त आमिर खान हाच नाही तर बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हे आपल्या कुटुंबासोबत जामनगरमध्ये सहभागी झाले आहेत.