Gen Z पेक्षाही खतरनाक असतात ‘या’ जन्म तारखेला जन्मलेले लोक, 100 वेळा अपयश आलं तरी हार मानत नाहीत
अंकशास्त्रानुसार या जन्म तारखेला जन्मलेले लोक कधीच संकटात खचत नाहीत; 100 वेळा जरी अपयश आले तरी ते प्रत्येक अपयशानंतर नव्याने सुरुवात करतात.

अंकशास्त्रानुसार काही मूलांकाचे लोक आयुष्यात कितीही अडचणी आल्या किंवा अपयश आले तरी हार मानत नाहीत. प्रत्येक संकटानंतर नव्या जोमाने उभे राहून पुन्हा प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती असते. विशेषतः मूलांक 4, 8 आणि 9 असलेल्या व्यक्तींवर अनुक्रमे राहू, शनी आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक मोठे बदल किंवा अनपेक्षित धक्के येण्याची शक्यता असते. मात्र, ते घाबरून न जाता परिस्थितीचा शांतपणे विचार करून नवीन नियोजन करतात.

8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. शनीच्या प्रभावामुळे त्यांना आयुष्यात संघर्षाचा सामना अधिक करावा लागू शकतो. यश मिळण्यास वेळ लागला तरी ते संयम राखून सातत्याने मेहनत करत राहतात आणि अखेरीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात.

9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक धाडसी आणि जिद्दी स्वभावाचे मानले जातात. कठीण परिस्थितीतही ते हार मानत नाहीत आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात.

अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या व्यक्ती स्वतःच्या अडचणी इतरांसमोर फारशा व्यक्त करत नाहीत. कितीही संकटे आली तरी ते अधिक खंबीर बनून पुढे जातात. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत राहतात. टीप: वरील माहिती अंकशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याच्या अचूकतेचा दावा करता येत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.