
उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.

उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार कठीण आहे. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने चक्क पिझ्झापासून बिकिनी तयार केली होती.

नुकताच उर्फी जावेद ही अत्यंत अतरंगी कपड्यांमध्ये दिसली. उर्फीने तिच्या डोक्यावर ब्लेझर घेतला जो तिने हॅन्गरच्या मदतीने लटकवला. या कपड्यांमध्ये तिचा चेहरा जास्त दिसतही नव्हता.

उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक चक्रावल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर कमेंटही केलीये.

उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत. मात्र, तिला अशा धमक्यांचा काहीच फरक पडत नाही.