
आले (Ginger) चहा देखील लाभदायत आहे. आले गर्भाशयातील रक्तप्रवाह वाढवते आणि पाळी सुरू होण्यासाठी मदत करते. 1 कप गरम पाण्यात किसलेले आले + मध टाकून दिवसातून 1–2 वेळा.

दालचिनी शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हार्मोनल समतोल ठेवण्यास मदत करते. दूध/चहा किंवा कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी. ओव्याचं पाणी देखील गुणकारी आहे. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा उकळवून प्या.

हळद शरीराला उब देते आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते. रात्री कोमट दुधात ½ चमचा हळद घ्या, तणाव हा पाळी उशिरा येण्याचा प्रमुख कारण आहे. अधिक तणावामुळे देखील पाळी उशीरा येते...

तणाव असल्यास योगासन करा... भुजंगासन, पवनमुख्तासन बटरफ्लाय पोज (बद्धकोणासन) तुम्ही करू शकता. मासिक पाळी वेळेत न येणे (अनियमित पीरियड) हे तणाव, हार्मोन्सचा बदल, कमी/जास्त वजन, अपुरी झोप, थायरॉईड, PCOS इत्यादी कारणांमुळे होऊ शकते.

पाळी 35 दिवसांपेक्षा जास्त उशीर होत असेल... सतत 2–3 महिने अनियमित असेल... खूप वेदना आणि जास्त रक्तस्त्राव असेल, गर्भधारणेची शक्यता असेल तर... सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.