'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा नेहमीच चर्चा होते.

अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

कसदार अभिनय आणि उत्तम नृत्य कलेसोबतच तिनं 'खतरो के खिलाडी' मध्येसुद्धा दमदार टास्क पूर्ण करत चाहत्यांची मनं जिंकली.

तिच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक कलाकारांनीसुद्धा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरनं अमृताला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं 'अय जिवलगा, हॅप्पी बर्थ डे' असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.