
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच 80 वर्षांचे होणार आहेत. त्यांनी सध्या घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारतासह अनेक देश अडचणीत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांनची चिंता वाढते.

दरम्यान, ट्रम्प यांचे काही अजब फोटो समोर आले असून ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्यांची चिंता वाढली आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या हातावर एक डाग दिसत आहे.

हा डाग नेमका कशाचा आहे, असे विचारले जात असून त्यांना कुठला आजार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान त्यांच्या हाताच्या याच चट्ट्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या हातावर दिसत असलेला हा डाग चट्टा नसून फाऊंडेशन, कन्सिलरचा एक थर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हात सतत सुजतो. तसेच त्यांच्या हातावर मेकअपचा थर दिसतो. लोकांशी सतत हातमिळवणी केल्यामुळे त्यांच्या हाताला त्रास होतो अशी माहिती समोर आली आहे.

ड्रम्प यांच्या हातावरील मेकअपच्या या थराबद्दल अमेरिकेतील व्हाईट होईसचे प्रेस सेक्रेटरी कोरलाईन लेव्हिट यांनी स्पष्टीकरण दिले होते. ट्रम्प यांच्या पायाला सूज आली होती. त्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली.

सतत हस्तांदोलन केल्यामुळे त्यांच्या त्वचेला इजा होते. ट्रम्प अॅस्परिन हे औषध घेतात. त्यामुळे त्यांची त्वचा पातळ होत आहे, असे स्पष्टीकरण लेव्हिट यांनी दिले होते.