

महत्वाचं म्हणजे मंजरी फडणीस या चित्रपटात हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या चित्रपटानंतर निर्माते अजय कुमार सिंग यांनी रिजनल मराठी सिनेमाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि 2010 मध्ये स्पेनिश ‘ज्युलिया आयज’ या चित्रपटाचा रीमेक मराठीमध्ये ‘अदृश्य ‘ चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

जून 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत असून लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

‘अदृश्य ‘ हा मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल, या चित्रपटात मंजरी फडणीस ही अदृश्य हॉरर रुपात दिसणार आहे.

मंजरी आणि पुष्कर सध्या सेटवर धमाल करत आहे. दोघांचा हा रोमँटीक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येणार आहे.

या फोटोंमध्ये दोघांनी केमेस्ट्री दिसतेय.