
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षीने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले.

विशेष म्हणजे तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी केला. झहीरसोबत लग्न केल्यापासून सोनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.

आता नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघेही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत.

सोनाक्षी आणि झहीर हे ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. दोघांनीही लाल रंगाचे सुंदर कपडे घातले होते. पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना हे दिसले.

सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवसांपूर्वीच विदेशातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी विदेशात धमाल करताना दिसले.