PHOTO | डोळ्यांमध्ये आशा, भूकेसाठी आक्रोश, शेतकरी आंदोलनातील हृदयस्पर्शी फोटो
शेतकऱ्यांनी 14 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर तंबू ठोकला आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. शेतकरी सोबत अन्नधान्य देखील घेऊन आले आहेत. केंद्र सरकारने मागणी मान्य केली नाही तर 26 जानेवारीपर्यंत आंदोलन सुरु ठेवू असा इशारा त्यांनी दिला आहे (Photos of Farmers Protest Delhi)
-
-
सध्या थंडीचं वातावरण आहे. हिवाळा सुरु आहे. दिल्लीत प्रचंड थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो शेतकरी गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर तग धरुन आक्रोश करत आहेत. केंद्र सरकार आपल्या मागण्या मान्य करेल या आशेपोटी त्यांनी दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकला आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांचे काही फोटो समोर आले आहेत.
-
-
ठंडी वाजू नये म्हणून काही शेतकरी उन्हात जमिनीवर झोपले आहेत. मात्र, सुर्यप्रकाश डोळ्यावर पडू नये म्हणून या शेतकऱ्याने डोळ्यांवर हात ठेवलेला दिसत आहे.
-
-
शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या या शेतकऱ्याने चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले आहेत. अंतर्मनात सुरु असलेला आक्रोश, भाव डोळ्यांमध्ये अश्रूंच्या रुपाने येऊ पाहात आहे. त्यामुळे हा बळीराजा डोळे आणि डोक्यावर हात ठेऊन स्वत:ला धीर देताना दिसत आहे.
-
-
शेतकरी आंदोलनात सहभागी असलेले शेतकरी जेवण कसं करत असतील याचा अंदाज या फोटोमधून लावता येईल.
-
-
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले हे आजोबा ट्रॅक्टरवर बसून जेवण करताना दिसत आहेत.
-
-
काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरच झोपण्याची व्यवस्था केली आहे
-
-
शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी केंद्र सरकारकडून भरपूर प्रयत्न सुरु आहेत. सरकारने बुधवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत एक प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवताना शेतकरी. केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला आहे.