
अभिनेता वरुण धवन याच्या घरी मुलीचे आगमन झालंय. वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने 3 जून 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

आता नुकताच नताशा दलाल हिला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रूग्णालयातून बाहेर पडताना वरुण धवन, नताशा दिसले आहेत.

विशेष म्हणजे वरुण धवन याच्या हातामध्ये त्यांची मुलगी दिसत आहे. आता हेच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

वरुण धवन आणि नताशा यांनी त्यांच्या मुलीच्या नावाची अजून घोषणा केली नाहीये. बाळाची अजून झलकही दाखवली नाहीये.

वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे लग्न आलिबागमध्ये पार पडले. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.